महाराष्ट्रकलाचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांतील संधींचा शोध घ्या – संतोष खैरनार

'टेडएक्स - पीसीयू २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ ऑक्टोबर २०२६) नव संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिज्ञासा, धैर्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण विचारमंथन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रचलित चौकटींच्या पलीकडे जाऊन विचार करावा आणि स्वच्छ ऊर्जा व सेमीकंडक्टर यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांतील संधींचा शोध घ्यावा असे मार्गदर्शन कार्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आयनॉक्स विंड चे अध्यक्ष संतोष खैरनार यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे ‘टेडएक्स – पीसीयू २०२६’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पीसीयू चे कुलपती तथा पीसीईटी विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सहभागी व्याख्याते व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपसंचालक हृषिकेश धनाडे, पीसीयूचे इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड इंडस्ट्री रिलेशन्स विभागाचे संचालक डॉ. प्रणव चरखा, विद्यार्थी विकास व कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. अंजू बाला, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्यकारी उपाध्यक्ष मुकेश जैन, कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शक सागर बाबर, मराठी स्टँड-अप कॉमेडियन सौरभ भोसले, ग्लोबल लीन चेंज एजंट आणि चेंज हॅकर सारिका खारबंदा, मारवाडी युनिव्हर्सिटी चे सहाय्यक प्रा. राहुल त्रिवेदी, मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर, वरिष्ठ कृत्रिम बुद्धिमत्ता आर्किटेक्ट आरशद देवानी, एच आर तज्ञ पुलकित हांडा भारतीय माजी लष्कर अधिकारी चिन्मय महाले आदींनी ‘टेडेक्स पीसीयू २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड विद्यापीठाने टेड एक्सचे पहिल्यांदाच आयोजन केले होते. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ञ, नवोन्मेषक, शिक्षण तज्ज्ञ यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सकारात्मक परिवर्तनाची क्षमता सिद्ध करण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचा उपयोग होईल असे डॉ. देसाई म्हणाले.

पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून शिकण्याच्या संधी पीसीयू उपलब्ध करून देते.
—————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button