महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

कालिदासाचे शिल्प अधिकृत व्हावे – शरद पवार

‘कालिदास सन्मान पुरस्कार २०२६' जाहीर - गोविंद वाकडे

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ ऑक्टोबर २०२६) भारतात अजूनही कालिदासाचे सर्वमान्य शिल्प नाही. परंतु हे शिल्प अधिकृत व्हावे असे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

नुकतेच मुंबईत शरद पवार यांच्या हस्ते कालिदास स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिल्पकार संजय खिलारे, महाकवी कालिदास कला निकेतन संस्थेचे अध्यक्ष गोविंद वाकडे, विश्वस्त अश्विनी सातव आदी उपस्थित होते.

महाकवी कालिदास कला निकेतन संस्थेतर्फे यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच महाकवी कालिदासांच्या सर्व साहित्यकृतींच्या रंगावृत्तींचा “पुणे कालिदास महोत्सव २०२६” जुलै २०२६ पासून पुण्यात सुरू झाला आहे. या विषयाची माहिती आणि संस्थेच्या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाची माहिती शरद पवार यांना देण्यात आली अशी माहिती गोविंद वाकडे यांनी दिली.

“पुणे कालिदास महोत्सव २०२६” सहा महीने चालणार असून या महोत्सवात आतापर्यंत मेघदूत ऋतु संहार, आषाढाचा पहिला दिवस ही नाटके सादर झाली आहेत. शाकुंतल, विक्रम उर्वशी, मालविक – अग्निमित्र, कुमार संभव आणि तीन भागातील महानाट्य रघुवंश सादर होणार आहेत. या महोत्सवानिमित्त यावर्षी पासून संस्थेने साहित्य आणि रंगभूमीवर विशेष योगदान दिलेल्या गुणीजनांचा गौरव करण्यासाठी “कालिदास सन्मान पुरस्कार” सुरू केले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले आहेत.

सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १२:३० वाजता, माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे, जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, सिने अभिनेत्री चिन्मयी सुमित, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त डॉ. विजय कुमार सूर्यवंशी, महमेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, आळंदी देवस्थान विश्वस्थ कबीर बुवा उपाख्य हभप चैतन्य महाराज लोंढे आणि जेआरबी इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक महेश भालेराव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती महाकवी कालिदास कला निकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद वाकडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

कालिदास नाट्य गौरव सन्मान मधू जोशी, चं. प्र. देशपांडे, प्रा. दिलीप जगताप, दीपक रेगे, चेतन दळवी, शरद सावंत (रंगभूषाकार);
सर्वोत्कृष्ट व्यवसायिक दिग्दर्शक भालचंद्र कुबल आणि अभिजित पानसे (घाशीराम कोतवाल);
सर्वोत्कृष्ट सृजनशील दिग्दर्शक स्वागत थोरात (अपूर्व मेघदूत); सर्वोत्कृष्ट नाट्यग्रंथ नाटक (नाटक रंगभूमीची परिभाषा अरुण कदम); सर्वोत्कृष्ट युवा अभिनेता (मराठी ) प्रितेश मांजलकर; सर्वोत्कृष्ट युवा अभिनेता (हिन्दी) मनोज डाळिंबकर (नाटक पतझड); सर्वोत्कृष्ट कालिदास नाट्य अभिनेत्री पर्ण पेठे – आषाढातील एक दिवस); लक्षवेधी युवा अभिनेत्री अश्विनी कासार, सोनाली मगर, अमृता ओंबळे; कैलास वाघमारे; सर्वोत्कृष्ट नाट्य वेशभूषा चैत्राली डोंगरे;

कालिदास साहित्य गौरव सन्मान
सर्वोत्कृष्ट चिंतनशील कादंबरी – गुरु, नितीन कोतापल्ले; सर्वोत्कृष्ट सामाजिक कथा – माऊली ढाबा अविनाश गायकवाड; सर्वोत्कृष्ट कथा संग्रह कोरिओग्राफर – सतीश तांबे; सर्वोत्कृष्ट संपादन – खेळ नियतकालिक – मंगेश नारायणराव काळे; सर्वोत्कृष्ट अनुवाद सीमांच्या पलीकडचे – नेहा भांडारकर; सर्वोत्कृष्ट सम्यक स्त्रीवादी कविता – धरणाच्या तळाशी – सारिका; सर्वोत्कृष्ट चिंतनशील कविता – चित्रक – श्रीकांत ढेरंगे; कालिदास कला संवर्धक सन्मान – महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, उद्योजक महेश भालेराव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय कुमार सूर्यवंशी आणि हभप चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांना जाहीर झाला आहे.
———————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button