महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व – डॉ. कांचन देशपांडे

पीसीसीओई मध्ये 'मी... माझा प्रवास, चर्चासत्र संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २१ ऑक्टोबर २०२६) प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. आपण प्रथम ध्येय ठरवून नियोजन करावे. सर्जनशीलतेचा वापर करून आत्मविश्वासाने सकारात्मक प्रयत्न केले की यश निश्चित मिळते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कायदा सल्लागार ॲड. परिक्रमा खोत, स्त्री रोग तज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार, न्यू एज फायर फायटिंग कंपनी संचालक सुजल शाह, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अंतर्गत तक्रार समिती उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव, अधिष्ठाता डॉ. शीतल भंडारी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

डॉ. क्षमा उपलेंचवार यांनी सांगितले की, अनेक स्त्रिया कुटुंबाची जबाबदारी घेऊन नोकरी, उद्योग व्यवसाय करतात. हे करत असताना त्यांना चिंता, ताणतणाव याचा सामना करावा लागतो, ही समाज व्यवस्था स्त्रियांशिवाय अपुरी आहे. त्यांच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे येतात. कुटुंबात प्रत्येक नात्याची तसेच नोकरी व्यवसायात प्रत्येक पदाची वेगळी जबाबदारी त्यांना घ्यावी लागते. ‘यश’ म्हणजे काय, हे शोधून काढा. स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या कामात आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य समतोल ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉ. क्षमा उपलेंचवार यांनी केले.

ॲड. परिक्रमा खोत यांनी सांगितले की, जे तुम्हाला योग्य वाटत नाही, त्याविरुद्ध नेहमी आवाज उठवा. केवळ चर्चा करून समानता येत नाही. जिथे गरज वाटेल, तिथे संघर्ष करायला हवा. बदलाची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी.

उद्योजिका सुजल शहा यांनी सांगितले की, तुम्हाला तुमचा मार्ग स्वतःच तयार करावा लागतो. आयुष्य नेहमीच सकारात्मक नसते, आपल्याला नकारात्मकतेलाही सामोरे जावे लागते. नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य याचा समन्वय साधता आला पाहिजे.

प्रास्ताविक करताना अंतर्गत तक्रार समिती उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव यांनी सांगितले की, महिलांना वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यावर महिलांचे विचार मंथन व्हावे त्यासाठी पीसीसीओई ने खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
डॉ. वृषाली भालेराव, डॉ. शिल्पा मोटेगावकर यांनी संयोजनात सहभाग घेतला.

स्वागत, प्रास्ताविक डॉ. प्रा. शीतल भंडारी, सूत्र संचालन स्नेहा कल्याणकर, आभार डॉ. सोनल गोरे यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button