महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

हिंदू शौर्य दिनानिमित्त रविवारी चिंचवड येथे विराट हिंदू मेळावा

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २१ ऑक्टोबर २०२६) नवरात्र उत्सव व विजयादशमी निमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी, (दि. २५) हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये हे ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

रविवारी, सकाळी ११ वाजता, चिंचवडगाव प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणाऱ्या या मेळाव्यात ‘भिकाऱ्यांचे डॉक्टर’ म्हणून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त झालेले डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०२६’ आणि निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश बालाजीराव सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे आणि समन्वयक कैलास बारणे यांनी दिली.

कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, श्रीमती अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर, संजय भाट, रमेश अर्धाले यांनी या ‘हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळावा’च्या संयोजनात सहभाग घेतला आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button