महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

जपान दूतावास सहकार्याने पीसीसीओई मध्ये ‘नो जपान २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १२ ऑक्टोबर २०२६) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावास सहकार्याने ‘नो जपान २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष आणि जपान सुविधा केंद्राद्वारे होणाऱ्या या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन शुक्रवारी, ( दि. १६ ऑक्टोबर) सकाळी १०:३० वाजता होईल. सर्वांसाठी मोफत असून पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे.

जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन चे प्रतिनिधी, उद्योग तज्ञ मार्गदर्शन करतील. ते जपान मधील उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, प्लेसमेंट, करिअरचे मार्ग, तांत्रिक प्रगती, उद्योगाच्या अपेक्षा आणि जपानी कार्यपद्धती याबद्दल माहिती देतील. जपान मधील उद्योग, शिक्षण, संस्कृती, शैक्षणिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक संधीं बद्दल माहिती दिली जाईल. हा उपक्रम पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि जागतिक शैक्षणिक, संशोधन व करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांना पूरक आहे. भारतातील विद्यार्थी आणि जपानमधील शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यात अधिक सामंजस्य आणि सहभाग वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे असे उपक्रम विद्यार्थ्यांना व्यापक जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात अशी माहिती पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत यांनी माहिती दिली की, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे. भारत व जपान यांच्यात अधिक सक्षम शैक्षणिक व व्यावसायिक संबंध निर्माण करणे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button