महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

देशाची जागतिक प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांची मोठी भूमिका – डॉ. विनोद गायकवाड

पीसीसीओईआर येथे पासपोर्ट सेवा शिबिर संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. यामध्ये शेती, उद्योग, शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ या विभागांचे मोठे योगदान आहे. भारतीय युवा वर्ग उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगारासाठी परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे प्रमाण यापुढेही उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. देशाची अर्थव्यवस्था पुढे आणि जागतिक प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन भारतीय परराष्ट्र सेवा विभाग अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे पासपोर्ट सेवा शिबिर व भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी डॉ. गायकवाड यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. डॉ. गायकवाड यांचे पीसीसीओईआरचे संचालक डॉ हरीश तिवारी यांनी स्वागत केले. उपसंचालक डॉ. राहुल मापारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक व इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

परराष्ट्र सेवेत असलेल्या करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, परदेशात जाताना घ्यावयाची काळजी, बाहेरच्या देशात वावरताना तेथील नियम जाणून घेणे, भारतीय दूतावास बद्दल माहिती तेथील हेल्पलाइन नंबर, तेथे काही समस्या आल्यास त्यावरील उपाय, भारतीय परराष्ट्र सेवे संबंधी असलेले अनेक गैरसमज दूर करत देशसेवेचे महत्त्व डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

तसेच शिबिरामध्ये पासपोर्ट साठीची अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज सादर करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. अर्चना कोल्लू, पासपोर्ट ड्राईव्ह टीम व स्वयंसेवक यांनी आयोजनात सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button