पीसीसीओई ला आयआयसी संस्थेचा “फोर स्टार” मानांकनाचा पुरस्कार – ज्ञानेश्वर लांडगे
पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा - विठ्ठल काळभोर


पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२६) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला आयआयसी संस्थेचा “फोर स्टार” मानांकनाचा पुरस्कार मिळणे पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नुकताच केंद्रीय शिक्षण मंत्रालय, एआयसीटीई, नवोन्मेष कक्ष, संस्थेची नवोन्मेष परिषद (आयआयसी) यांच्या वतीने “फोर स्टार रेटिंग” असणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पीसीसीओई ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात कॅम्पस मध्ये नवोन्मेष आणि स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष कक्षाने निर्धारित केलेले विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले होते. त्याची दखल घेऊन आयआयसी ने “फोर स्टार रेटिंग” प्रमाणपत्र देऊन गौरव केला. एआयसीटीई चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम; शिक्षण मंत्रालय, नवोन्मेष कक्ष मुख्य नवोन्मेष अधिकारी डॉ. अभय जेरे आणि शिक्षण मंत्रालय, नवोन्मेष कक्ष सहायक नवोन्मेष संचालक दिपान साहू यांनी प्रमाणपत्र देऊन पीसीसीओई व्यवस्थापनाचा सन्मान केला.

पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पीसीसीओईने या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील ॲस्ट्रोव्हर्स अक्षयन २०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. फॉर्म्युला भारत या आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये व्यवसाय योजना सादरीकरणात तिसरे स्थान मिळवले. तसेच नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लिकेशन अँड रिसर्च या राष्ट्रीय स्पर्धा मध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे. इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २६ मध्ये ‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ आणि जागतिक क्रमवारीत १२ वा क्रमांक मिळवला आहे अशी पीसीसीओईची दैदीप्यमान कामगिरी आहे.
पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनी या विषयी कौतुक करताना सांगितले की, पीसीसीओई ने राष्ट्रीय स्तरावरील ई-बाजा एसएई इंडिया या स्पर्धे मध्ये एकूण द्वितीय उपविजेतेपद मिळवले आहे यामध्ये स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, एंड्युरन्स, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स आणि सेल्स या पुरस्कारांचा समावेश आहे. पीसीसीओई च्या विद्यार्थ्यांची अशी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील लक्षवेधी कामगिरी हे पीसीसीओई संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांचे सामूहिक यश आहे.
पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, नियामक मंडळाचे सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी या यशाबद्दल पीसीसीओई टीमचे अभिनंदन केले.
पीसीसीओई संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, यामुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची संस्थेची वचन बद्धता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. संस्थेची नवोन्मेष परिषद हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष कक्षाचा (एमआयसी) एक उपक्रम आहे. पीसीसीओईने १०० पैकी ८६.७७ गुणांचा प्रभावी कामगिरी स्कोअर मिळवला असून, त्यांचे सर्व १०५ नवोन्मेष आणि उद्योजकता उपक्रम मंजूर झाले आहेत. हे यश नवोन्मेष आधारित शिक्षण, उद्योजक विचार, बौद्धिक संपदा हक्क, जागरूकता आणि स्टार्टअप विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सामूहिक यश आहे. पीसीसीओईच्या नवोन्मेष आणि उद्योजकता विभागाच्या अधिष्ठाता आणि आयआयसीच्या अध्यक्षा डॉ. रजनी पी. के., सहयोगी अधिष्ठाता आयईएन आणि आयआयसीचे उपाध्यक्ष डॉ. मुबीन तांबोळी, सहयोगी अधिष्ठाता आयईएन आणि आयआयसीचे संयोजक डॉ. अजय गाढे यांचेही परिषदेच्या उपक्रमांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान आहे.
——————————————————————




