महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन ही यशाची गुरुकिल्ली – मनीषा तपस्वी

एसबीपीआयएम येथे 'यशस्वी उद्योजक' कार्यशाळा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२६) समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर उपाय शोधून त्याचे संधीत रूपांतर करणे म्हणजे यशस्वी उद्योजकता आहे. शिस्तबद्धता, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे असे मार्गदर्शन दे आसरा फाउंडेशन च्या व्यवस्थापक मनीषा तपस्वी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये उद्योजकता सेल आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या वतीने ‘यशस्वी उद्योजक’ ही उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दे आसरा फाउंडेशन व्यवस्थापक मनीषा तपस्वी, स्नेहा दिवेकर, एसबीपीआयएम संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.

दे आसरा च्या स्नेहा दिवेकर यांनी सांगितले की, जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करायच्या असतील, तर कोणासोबतही काम सुरू करा, त्यांना मदत करा, अनुभव घ्या आणि मग तुमचा व्यवसाय सुरू करा. उद्योजक मानसिकता हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे; सर्व काही मानसिकतेवर अवलंबून असते. भारतात अनेक कल्पना आहेत, तुम्हाला तुमच्या सभोवतालचे निरीक्षण करून स्वतःचा वैयक्तिक ब्रँड तयार करावा. पुढे ५ वर्षांनंतर तुम्हाला काय बनायचे आहे, ते लिहून काढा आणि त्यावर काम करा. वेळ वाया न घालवणे. इतरांशी संपर्क साधने आणि सहकार्य करणे हे गुण उद्योजकतेला पूरक आहेत.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेंद्र देवकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button