पीसीसीओई येथे अभियांत्रिकी तांत्रिक महोत्सव नवोपक्रमांचे प्रदर्शन


पिंपरी, पुणे (दि. ६ नोव्हेंबर २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘टेकफेस्ट २०२६’ अभियांत्रिकी तांत्रिक महोत्सव नवोपक्रमांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. असोसिएट डीन अमित पांचवडकर, डॉ. पी. ए. देशमुख यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

यामध्ये तांत्रिक स्पर्धा, नवोपक्रम आव्हाने सर्जनशील उपक्रम राबविण्यात आले. टीम मेसा ने सादर केलेल्या’गॅलॅक्सिया २०२६’ मध्ये अभियांत्रिकी आव्हाने, मशिनिंग, रोबोटिक्स आणि मोटर स्पोर्ट सिम्युलेशन्स यांचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ‘स्ट्रक्चरल शोडाऊन’- एक पूल मॉडेल बनवण्याची स्पर्धा; ‘बियॉन्ड द बेंचमार्क’ तांत्रिक प्रश्नमंजुषा आणि क्षेत्रीय सर्वेक्षण स्पर्धा; ‘इकोव्हिजन’ – शाश्वतता पोस्टर बनवण्याची स्पर्धा; ‘द साईट इन्व्हेस्टिगेशन’ – एक तांत्रिक खजिना शोध मोहीम; ‘कॅडनोव्हा’ – ऑटोकॅड आधारित आराखडा तयार करण्याची स्पर्धा; ‘३-डी शोडाऊन’ – ३ डी मॉडेल प्रिंटिंग स्पर्धा; इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभाग ‘नेक्सस २०२६-२७: ड्रिव्हन बाय आयडियाज’ या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. फॉर्म्युला हार्डवेअर, एरो एक्स, पिट स्टॉप प्रोटोकॉल आणि पीसीसीओई गॉट टॅलेंट यांचा समावेश होता. याची संकल्पना फॉर्म्युला वन यावर आधारित होती. संगणक विज्ञान, एआय विभाग, एआयएमएसए विभागाने प्रकल्प सादर केले होते.


संगणक अभियांत्रिकी विभाग ‘अनंत्या’२६’ सादर केले. यामध्ये कोडिंग, सायबर सुरक्षा, हॅकेथॉन आणि आयओटी चा समावेश होता. ‘शी सॉल्व्हज ३.०’ मध्ये १०९ संघांची नोंदणी झाली होती. सीएसइ (एआय आणि एमएल) विभागाद्वारे आयोजित ‘आर्टिमास २०२६-२७ मध्ये हॅकमॅट्रिक्स ५.० डेटाथॉन आणि सायबर सुरक्षा आव्हानांचा समावेश होता.

क्रेसा आणि पीसीसीओइ एसीएम एसआयजीएआय द्वारे आयोजित अन्वेषण ३.०; प्रॉम्प्टिफाय – एक रहस्य-प्रॉम्प्टिंग एआय आव्हान, द किलर्स ट्रेल – एक उत्कंठावर्धक रहस्य सोडवण्याचा अनुभव, आणि लॉजिक लॅम्प ३.० – कोडबिडसह एक सांघिक कोडिंग आणि बिडिंग स्पर्धा याचा समावेश होता.

महाराष्ट्रातील सर्व संस्थांमधील एकूण नोंदणी १५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आव्हाने, मशिनिंग, रोबोटिक्स आणि मोटर स्पोर्ट सिम्युलेशन ची माहिती मिळाली. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाचा भाग म्हणून सांघिक कार्य, सर्जनशीलता समस्या निवारणाला प्रोत्साहन मिळाले.
——————————————————————




