जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक ऍक्रोबॅटिक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे यश


पिंपरी, पुणे (दि. २ नोव्हेंबर २०२६) जिल्हास्तर शालेय जिम्नॅस्टिक ऍक्रोबॅटिक स्पर्धेमध्ये १९ वर्षा खालील गटात एस. बी. पाटील पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात उल्लेखनीय यश मिळवले. निगडी येथील इलाईट जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या या स्पर्धेत मुलींमध्ये कृष्णल खंडागळे ६ वी व सावनी बडवे ७ वी यांनी तसेच मिश्र जोडी मध्ये ओम पाटील १० वी व ओवी निकम ९ वी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.


तसेच मुलांच्या गटात विश्वतेज डेरे ७ वी आयुष मगर ६ वी आणि वेदांत देशपांडे ९ वी अक्षत वारके ९ वी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचबरोबर रुद्र जंगीरवाड ९ वी अमित कोडगोनोरा ९ वी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेत विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक डॉ. बिंदु सैनी, उपमुख्याध्यापक पद्मावती बंडा, क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
——————————————————————



