महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न

२०० पेक्षा अधिक वधू वरांचा सहभाग

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२६) खान्देश मंडळाने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आयोजित केलेला वधू वर पालक परिचय मेळावा हे उत्कृष्ट आयोजनाचे उदाहरण आहे. अशा मेळाव्यामुळे समाजाचा वेळ व पैसा वाचतो तसेच नागरिकांचा सामाजिक संपर्क देखील वृद्धिंगत होतो, अशा मेळाव्याची सर्व समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केले.

खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड या संस्थेच्या वतीने २८ वा वधू वर पालक परिचय मेळावा पिंपरी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कामगार नेते योगेश तळेकर, नाशिक चे महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष प्रकाश महाजन, पिंपरी चिंचवड माजी महापौर नगरसेवक वैशाली घोडेकर, खानदेश मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन अभिनेता डॉ. संजीव पाटील, निवृत्त अधिकारी दादाजी सोनवणे, महात्मा फुले शिक्षण संस्था भडगाव चे अध्यक्ष दीपक संभाजी महाजन, जळगाव च्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, मंडळाचे माजी अध्यक्ष पी. के. महाजन, नानाभाऊ माळी, वधू वर समिती प्रमुख उदयभान पाटील, मेळाव्याचे अध्यक्ष प्रकाश महाजन आधी उपस्थित होते.

या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, सी. ए., वकील, शिक्षक तसेच पदवीधर व पदव्युत्तर अशा २०० पेक्षा अधिक इच्छुक वधू वरांनी सहभाग घेतला होता.

प्रास्ताविक नकुल महाजन, स्वागत राजेंद्र महाजन, सूत्र संचालन नवल खैरनार यांनी केले. पुनम वाघ, रमेश बिरारी, ॲड. गोविंदा माळी यांनी मुलाखती घेतल्या. आभार गणेश चौधरी यांनी मानले.

वधू वर पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश सोनवणे, समिती उपाध्यक्ष योगेश माळी, संस्थापक एस. के. माळी, उपाध्यक्ष प्रशांत महाजन, खजिनदार रवींद्र माळी, संघटक दिपक बागुल, रजनी वाघ, सेवानिवृत्त अधिकारी विजय महाजन, नलिनी वाघ, सुधाकर बोरसे, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर‌ महाजन, जेष्ठ सल्लागार भिमराव माळी, किशोर वाघ, डी. के. माळी, एस. डी. माळी, पी. झेड. माळी, ज्ञानेश्वर महाजन, जितेंद्र चौधरी, अनिल सोनवणे, नितीन देवरे, विजय वाघ, सुभाष देवरे, भरत सोनवणे, शशीकांत खलाणे, पंढरीनाथ महाजन, प्रदीप देवरे, भगवान माळी, केशव सौंदाणे, निलेश खैरनार, पोपट पवार, सचिन अहीरे, खुशाल शेवाळे , भूषण मोरे, सुभाष माळी, किशोर बागुल, ऋषिकेश महाजन, सुनिल माळी, समीर माळी, सुनिल माळी, किरण माळी, भरत अहीरे, अर्जुन वाघ, गणेश महाजन, ईश्वर देवरे, पुनमचंद महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button