

पिंपरी, पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२६) सततचे हेवेदावे, आरोप प्रत्यारोप, वर्चस्ववाद, कुरघोडीचे राजकारण…सगळं काही बाजूला ठेवून राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शनिवारी (७ नोव्हेंबर) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या ‘दिवाळी फराळाची’ यंदा दशकपूर्ती होती. यानिमित्ताने काळेवाडी तील ‘रागा पॅलेस’ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्यात खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास साडेतीन तास गप्पांची मैफल रंगली. सर्वांच्या सहभागामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप,बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, पिंपरी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.


याशिवाय, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शिवसेनेचे शहराध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, आर.पी.आय.चे शहराध्यक्ष नगरसेवक कुणाल वाव्हळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, अजित गव्हाणे, सचिन साठे, सदाशिव खाडे, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, विनोद नढे, अमित गावडे, सुरेश भोईर, तुषार हिंगे, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, सुजीत पाटील, यशवंत भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, विष्णुपंत नेवाळे, माणिकराव अहिरराव, महेश कुलकर्णी, राजेंद्र बाबर, अमित बाबर, निलेश शिंदे, अनिल लोंढे, हेमंत फुगे, उमेश लोंढे, रमेश काशीद, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, महेश कुलकर्णी, इंद्रायणी बँकेचे संस्थापक ॲड. एस. बी. चांडक, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, वसंत काटे, विजय जगताप, उमेश चांदगुडे, मनोज जरे, अशोक पुजारी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, पिंपरी पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, गणेश कवठेकर, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष राहुल भंडारे, लेखक दिग्दर्शक संतोष पवार, राजेश शिंदे, नितीन धुंदुके, ‘कलोपासक’चे प्रदीप पाटसकर, ‘लीड मीडिया’चे प्रमुख विनोद सातव, किमया ‘कम्युनिकेशन्स’चे जयंत शिंदे आदी उपस्थित होते.


दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत केले.


राजेंद्र करपे, संतोष बाबर, नंदकुमार कांबळे, संतोष निंबाळकर, गोरख भालेकर, नाना शिवले, सचिन साठे आदींसह दिशा सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी संयोजन केले.


सूत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार बाजीराव लोखंडे यांनी मानले.
*मान्यवरांचा ‘दिशा सन्मान’*
दिशा सोशल फाऊंडेशनच्या ‘दशकपूर्ती दिवाळी फराळ’ उपक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेश सूर्यवंशी यांचा सत्कार सेवानिवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड व आमदार महेश लांडगे, शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
चिंचवड येथील आगीच्या प्रसंगी धाडस दाखवून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या आर्या विजय कांबळे या धाडसी युवतीचा सत्कार महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
पुण्यात सलग सात प्रयोग करून विश्व विक्रमाची नोंद करणारे आणि हजाराव्या प्रयोगांचा टप्पा गाठलेले लोकप्रिय बालनाट्य ‘अलबत्या-गलबत्या’ टीमचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. निर्माते राहुल भंडारे, अभिनेत्री श्रध्दा हांडे, सनी मुणगेकर, निलेश गोपनारायण यांनी सत्काराचा स्वीकार केला.
जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘द फोक आख्यान’ टीमचा सत्कार शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अर्णव कोतकर, शुभम साळवी, विश्वजीत लोंढे, अभिजीत लोंढे यांनी सत्कार स्वीकारला.
हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचा सत्कार आमदार शंकर मांडेकर, अमित गोरखे, डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रसिध्द नाटककार, लेखक व दिग्दर्शक संतोष पवार यांचा ‘चंद्ररंग’चे संचालक विजय जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिशा परिवाराच्या वतीने ‘pc7’ चॅनेलचे प्रमुख, पत्रकार संदेश पुजारी यांचा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक राहूल कलाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
——————————————————————




