महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे शिक्षक दिनाचा अनोखा सोहळा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ९ सप्टेंबर २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, नियोजन कौशल्याचा आणि शिक्षकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा सुंदर आविष्कार ठरला. विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांमुळे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळालेल्या प्रेरणेचे मनापासून स्मरण केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ आणि उत्स्फूर्त उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. गुरु – शिष्य नात्यातील स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचे दर्शन यावेळी घडले.

प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button