विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धांमधे पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन चे वर्चस्व
पीसीपी च्या खेळाडूंनी नऊ क्रीडा प्रकारात एकूण १३ बक्षीसे पटकावली

पिंपरी, पुणे (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने आयोजित केलेल्या डी १ झोन च्या ॲथलेटिक्स स्पर्धांमधे पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन ने वर्चस्व गाजवले.

बेल्हे येथील समर्थ तंत्रनिकेतन च्या क्रीडांगणावर या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन (पीसीपी) मधील मुले आणि मुलींच्या संघाने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवत १५ पैकी ९ क्रीडा प्रकारात १० सुवर्ण आणि ३ रौप्य असे एकूण १३ पदके मिळवून पीसीपीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
पीसीपी मुलांच्या संघात दिनेश फड याने लांब उडी, उंच उडी आणि तिहेरी उडी या तीन क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून एकतर्फी बाजी मारली. अथर्व रेणुसे याने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अंकित नलावडे याने थाळी फेक तर मयुर धांडे याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत कुरकुटे याने १५०० आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला.
पीसीपीच्या मुलींच्या संघामध्ये रिद्धीश्री वानागुट्टे हिने ४०० व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धा मोठ्या फरकाने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. सुहानी गिते हिने तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांच्या रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजय मिळवला. रिले संघात निलेश बधुरे, वेदांत कुरकुटे, दिनेश फड आणि अथर्व रेणुसे यांचा समावेश होता.
पीसीपी प्राचार्य डाॅ. विद्या बॅकाॅड, संघ व्यवस्थापक राहुल चव्हाण, अविनाश जगदेव, अतुल सावळे, मोनिका चिपरीकर, पुनम तेरनीकर, क्रिडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थरकुडे यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————————


