प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांसाठी अजित पवार यांची गुरुवारी सभा
भाजपा नेत्या कोमल शिंदे यांचा प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा

पिंपरी, पुणे (दि. ०७ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता, लिंक रोड, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक धनराज आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे पाटील, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, माजी अध्यक्ष अजित गव्हाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी तसेच विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

तसेच भाजपाच्या प्रदेश निमंत्रित सदस्य तथा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कोमल रमेश शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजितदादा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. कोमल शिंदे या उच्चशिक्षित असून प्रभाग क्रमांक १९ मधील आनंद नगर येथे त्यांचे माहेर आणि सासर आहे. मुक्ताई सोशल फाउंडेशन या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष असून पिंपरी चिंचवड शहर परिसरात ७०० पेक्षा जास्त महिला या संस्थेच्या सभासद आहेत. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, स्वच्छता दूत, कचरावेचक महिला, छोटे मोठे व्यावसायिक, युवती यांचा सहभाग आहे.

उच्चशिक्षित असणाऱ्या कोमल शिंदे यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन भाजपाने त्यांना विविध पदांवर काम करण्याची जबाबदारी दिली होती. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास आणि भविष्यातील शहर विकासाचे नियोजन मतदारांना सांगण्यासाठी आता कोमल शिंदे मैदानात उतरल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी आणि लहू तोरणे यांनी केले.
——————————————————————



