महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ३ मार्च २०२६) पीसीईटीच्या सर्व संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी सिद्धी काळे हिने लिहिलेल्या शाश्वत वास्तुकलेचे महत्व या निबंधाचे प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी आणि सर्व प्राध्यापकांनी विशेष कौतुक केले.

यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक वाचन उपक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये शिक्षण, संशोधन, उद्योग, अर्थ, सामाजिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रातील पुस्तके व लेखांचे तसेच कथा, नाटक, कादंबऱ्या, कवितासंग्रह याचे सामूहिक आणि वैयक्तिक वाचन करण्यात आले. तसेच ग्रंथालयातील मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. पीसीईटी कॅम्पस मधील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांनी निबंधलेखन व काव्यवाचन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. प्रज्ञा आवटे, प्रा. शुभदा अग्रवाल ग्रंथपाल पूनम सांगळे व ग्रंथालय सहाय्यक प्रिया वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील ग्रंथांविषयी माहिती देऊन वाचनासाठी प्रोत्साहन दिले.

पीसीइटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
——————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button