भोसरी गावठाणात भाजप उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार
बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांच्यासह युवकांचा प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारात सहभाग

पिंपरी, पुणे (दि. ०७ जानेवारी २०२६) विकासात्मक हिंदुत्वाचा विचार घेऊन पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प राबवले. मागील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील भाजपा युवा नेते रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भाजपचे खाते उघडले आहे.

भोसरी गावठाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत, भोसरी गावठाण परिसरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, जलतरण तलावाचा विकास, भाजी मंडईचा विकास, १०० बेडचे आत्याधुनिक नूतन भोसरी रुग्णालय, बैलगाडा शर्यत घाट परिसराचा विकास, बैलगाडा शर्यत शिल्प आणि योगासन समूह शिल्प आदी भव्य दिव्य कामे झाली आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत, म्हणून प्रभाग क्रमांक ७, भोसरी गावठाण येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांना निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे दिसते.

भाजपाच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मंगळवारी, बुधवारी धावडे आळी, फुगे – माने आळी, गव्हाणे आळी, डोळस वस्ती, पाचारणे वाडा, पठारे लांडगे आळी तालीम या परिसरात घरोघरी जाऊन मतदारांना प्रचार पत्रक दिले. ठिकठिकाणी महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. ‘अबकी बार १०० पार’ चे ध्येय ठेवून भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्धपणे प्रचारात आघाडी घेतली आहे. तर भोसरी गावठाण मधील भाजपच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे दिसते.
मंगळवारी आणि बुधवारी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेवक सखाराम डोळस, गोपीकृष्ण धावडे, बाळासाहेब लांडगे, अशोक लांडे, संकेत लांडे, आप्पा खराबी, बाबू खराबे, अंकुश लोंढे, संतोष फुगे, शंकरराव लांडगे, राहुल शंकर लांडगे, काळुराम लांडगे, दिलीप गाढवे, कृष्णा सोपान लांडगे, संदिप धावडे, दिपक धावडे, प्रदीप धावडे, सुदाम माने, रोहिदास माने, निवृत्ती माने, मारुती माने, संजय फुगे, विजय फुगे, विलास फुगे, प्रकाश डोळस, निलेश डोळस, चेतन भालेराव, अमित डोळस, बाजीराव शंकरराव लांडगे, किसन लांडगे, काळुराम पवळे, संजय पठारे, कलावती लांडगे, सुनीता लांडगे, बायडाबाई टिंगरे, मयूर लांडगे, महेश बबन लांडगे, सागर डोळस, लखन गाडे, ओमकार मुळे, विकास काळजे, सागर टिंगरे, सादिक गाडे, किरण लांडगे, राहुल लांडगे, काळुराम लांडगे, दिलीप गाढवे, कृष्णा लोंढे, दादू डोळस, राजकुमार डोळस, विशाल लांडगे, संतोष महाराज लांडगे, मामा होले, बाळू गायकवाड, संतोष फुगे, महेंद्र फुगे, गणेश खरमाले, राजू मल्हारी फुगे, सचिन किर्डक आदी उपस्थित होते.
—————————————————————–



