मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपला पाहिजे – डॉ. किर्ती धारवाडकर
संत साहित्यातून समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धेवर प्रहार - डॉ. किर्ती धारवाडकर, एसबीपीआयएम मध्ये मराठी भाषा गौरवदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

पिंपरी, पुणे (दि. ६ मार्च २०२६) महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. मराठी संतांनी आपल्या भजन, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, कथा, नाटक, कादंबऱ्या, कवितासंग्रह तसेच इतिहास संशोधकांच्या बखर, प्रवास वर्णन, आत्मचरित्र अशा विविध साहित्यातून समाजाचे प्रबोधन करून अंधश्रद्धेवर प्रहार केले. यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. आपल्या भाषेचा हा समृद्ध वारसा आपण जपला पाहिजे असे मार्गदर्शन एसबीपीआयएम संस्थेच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी केले.

मराठी भाषा गौरवदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एसबीपीआयएम महाविद्यालय येथील ग्रंथालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस एसबीपीआयएम संस्थेच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. योगेंद्र देवकर, युवा शाहीर शुभम भुतकर, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

युवा शाहीर शुभम भुतकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर वर पोवाडा सादर केला.
प्रा. स्वाती सातपुते, विद्यार्थीनी अनघा कुलकर्ण यांनी समन्वयक म्हणून काम केले.
सूत्रसंचालन हर्षदा पाटील यांनी केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरवदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
——————————————————————


