महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

शिक्षक हे समर्पण भावनेने काम करतात – महापौर रवी लांडगे

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या क्षितिजय नप्ते चा सत्कार संपन्न, महात्मा फुले विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ११ जुलै २०२६) भोसरी मधील महात्मा फुले विद्यालय आणि पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय अनुदानित शाळेतील शिक्षक हे समर्पण भावनेने काम करतात हे अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी केले.

भोसरी येथील महात्मा फुले जागृती संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयातील क्षितिजय नप्ते याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्याचा व इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका मंगल आहेर – गावडे या सर्वांचा सत्कार महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक व भोसरी येथील महात्मा फुले जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंत लोंढे, नगरसेवक विराज लांडे, सोनाली गव्हाणे, माई पठारे, संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत रासकर, शिवलिंग ढवळेश्वर, दिगंबर ढोकळे, मुख्याध्यापक सुलभा चव्हाण, मोहन वाघुले, सुलोचना वसंत लोंढे, शिक्षक, यशस्वी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. तत्पूर्वी गुणवंत विद्यार्थ्यांची भोसरी गावठाण परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.

संस्थेचे उपाध्यक्ष श्याम लोंढे, अनिल लोंढे, सोमनाथ रासकर, सचिव संतोष लोंढे, उपसचिव संदीप लोंढे, खजिनदार वृषभ रासकर, सह खजिनदार दीपक लोंढे, महेश लोंढे, हिशोब तपासणीस विजय लोंढे, सह हिशोब तपासणीस अतुल रासकर, सभासद तुषार लोंढे, संकेत लोंढे, सिद्धेश लोंढे, अमित लोंढे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता.

यावेळी महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की, या संस्थेचे अध्यक्ष नाना लोंढे हे आमचे गुरू आहेत. त्यांनी कामगार, उद्योग, सहकार, व्यापार, अध्यात्म, राजकीय अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आता त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती करायचे ठरवले आहे. भोसरी मधील विद्यार्थी आता शहरात शैक्षणिक क्रांती करतील असा विश्वास आहे. मी देखील वाबळेवाडी येथील दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या शाळेचा आदर्श डोळे पुढे ठेवून वैयक्तिक खर्चाने एक शाळा विकसित करीत आहे. वाबळेवाडीतील शाळेप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १३२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शाळा बाह्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसा पथदर्शी प्रकल्प म्हणून काम सुरू केले आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड शहर गुणवंतांचे शहर म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी गुणवत्ता यादीतील क्षितीजय नप्ते, वेदांत गोरडे, तनिष्का केदार, वैदिक कदम, ऋग्वेद गावडे, प्रत्यंचा गायकवाड, विणा पाटील, ध्रुव दैन, प्रज्वल काटे, वेदिका बरुरे, हर्षदा खांडेकर, वेदांत बंडगर, अमित कुलुंगे, स्वरा पामलवाड, स्वरा जगताप, ज्ञानेश लांडे, हर्षाली बावा, श्लोक गायकवाड, सार्थक सावंत, श्रेया जगताप, स्वराज शेळके, ईश्वरी टाकसाळ, युगंधरा ठाकूर आणि अनुष्का घाडगे, भावेश कोल्हे तसेच प्रतीक शिंदे (१० वी मध्ये ९५.८५ टक्के गुण) या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

स्वागत, प्रास्ताविक वसंत लोंढे, सूत्र संचालन शरद कर्णवर आणि आभार सुलभा चव्हाण यांनी मानले.
——————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button