जिल्हास्तरीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक


पिंपरी, पुणे (दि. २१ जुलै २०२६) जिल्हास्तरीय बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या १२ वर्षे खालील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम फेरीत नोवेल इंटरनॅशनल स्कूल वर विजय मिळवला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील स्कूल मध्ये ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली शालेय अभ्यासक्रम आणि मैदानी खेळांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे या स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूल संघाला ओवर ऑल चॅम्पियनशिप मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. या यशस्वी संघात मोहीत गाजरे, श्लाेक ढवळे, ओम यलवंडे, अथर्व साळुंखे, अर्चित वाघमोडे, केवल राने, अर्णव अव्हाड, शौर्य झेंडे, सिद्धार्थ जाधव, रुद्र यादव, निवाण तिवारी, अद्विक हवळे, श्लोक बरलोटा या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदु सैनी, उप मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे प्रोत्साहन व शिक्षक धनाजी पाटिल यांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
—————————————————————–



