एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे संग्रह प्रदर्शन सुरू

पिंपरी, पुणे (दि. ७ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन ‘संग्रह वास्तुकलेचा सृजनशील प्रवास’ या प्रदर्शनाची ५ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर अध्यक्ष डॉ. अभय पुरोहित यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. पुष्कर कानविंदे, किरण कलमदानी, प्राचार्या डॉ स्मिता सूर्यवंशी, रोशनी देशपांडे, श्रेया कानडे आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात आर्किटेक्चरल प्रबंध २०२५, हेरिटेज डॉक्युमेंटेशन २०२५, विद्यार्थ्यांचे प्रकल्प, वारसा दस्त ऐवजीकरण यांची माहिती मांडण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि व्यवसायिक चर्चेला चालना मिळेल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्जनशीलता यातून दिसून येते. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना प्रा. जयश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी, रोशनी देशपांडे, श्रेया कानडे यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हे प्रदर्शन १६ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या परिसरात सर्वांसाठी खुले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी केले आहे.
——————————————————————–



