महाराष्ट्रक्रीडाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

राज्यस्तरीय मुलांच्या कॅरम स्पर्धेत पीसीपी पॉलिटेक्निकचा प्रथम क्रमांक

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ७ मार्च २०२६) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन व केपीसी योगेश्वरी पॉलिटेक्निक, आंबेजोगाई, तालुका बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मुलांच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या सुरुवातीपासूनच मोठ्या फरकाने विजय संपादन करत अंतिम फेरी जिंकून प्रथम क्रमांक पटकावला.

अंतिम सामना ग्रामीण पॉलिटेक्निक, नांदेड व पीसीपी पॉलिटेक्निक यांच्यामध्ये झाला. या सामन्यामध्ये पीसीपी ने २-१ गुण संपादन करून विजय ट्रॉफी वर आपले नाव कोरले. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नऊ संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक संघात आदेश ठाकरे, प्रसाद मोरे, सम्यक गवळी, शिवाजी पवार, अद्वैत साळुंखे यांचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षक राजू गायकवाड व सुनील गायकवाड तसेच क्रीडाप्रमुख सुनील जगताप यांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड यांनी विजेत्या संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button