महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरी

संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने काम – डॉ. हरीश तिवारी

पीसीसीओइआर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत ६५० संशोधक ऑनलाईन सहभागी

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ७ मार्च २०२६) संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण संशोधन प्रबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पीसीसीओईआर चा संशोधन व विकास विभाग सातत्याने काम करत असल्याचे पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले. त्या अंतर्गत “प्रभावी संशोधन लेखन, तत्वे आणि सराव” या विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देश, विदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी संशोधन लेखाची रचना, प्रभावी शीर्षक व सारांश लेखन, साहित्य सर्वेक्षणाची योग्य पद्धत, उच्च दर्जाच्या नियतकालिकांची निवड, संदर्भ व उद्धरण पद्धती तसेच साहित्यचौर्य टाळण्याच्या तंत्रांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेचा उद्देश प्राध्यापक, संशोधक आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन लेखन कौशल्य विकसित व्हावे असा आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ६५० हून अधिक संशोधकांनी ऑनलाइन पद्धतीने संशोधन प्रबंध सादर केले, हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे असेही पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मधील संशोधन व विकास विभागाच्या वतीने “प्रभावी संशोधन लेखन : तत्वे आणि सराव” या विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेत डॉ. पारिक्षित महाले (व्हीआयटी, पुणे) यांनी “संशोधनाची ओळख” या विषयावर संशोधनाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट केली. डॉ. मनीष शर्मा (डीवायपीसीओई, पुणे) यांनी “पद्धतशीर साहित्य सर्वेक्षण” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. डॉ. समीर गजघाटे (जीएचआरसीईएम, पुणे) यांनी “संशोधन प्रस्तावाचे नियोजन व लेखन” या विषयावर महत्त्वपूर्ण पैलू मांडले. डॉ. सूर्य प्रकाश (इलाहाबाद) यांनी संशोधनाचा प्रभाव कसा वाढवायचा याविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ. उमेश भाडाडे (एसएलआरटीसीई, मुंबई) यांनी “संशोधन निष्कर्ष व परिणाम” या विषयावर परिणाम मांडणी व निष्कर्ष लेखनाची प्रभावी पद्धत समजून सांगितली.

डॉ. सुदर्शन बोबडे, डॉ. राहुल बावणे यांनी संयोजन केले. समन्वयक म्हणून डॉ. किशोर भांगले, डॉ. शिवांगा गव्हाणे यांनी काम पाहिले. उपसंचालक डॉ. राहुल मापारी व कुलसचिव प्रकाश येवले यांनी मार्गदर्शन केले.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button