राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक संघ उपविजेता

पिंपरी, पुणे (दि. ९ मार्च २०२६) आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या वतीने संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी अंतिम सामन्यात अहिल्यानगर येथील नेप्ती पॉलिटेक्निकच्या संघाने १९ गोल केले तर पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या (पीसीपी) संघाने १० केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक उपविजेत्या मुलांच्या फुटबॉल संघात अनिकेत खोसे, राजवीर आखाडे, रवीतेज यादव, सागर माळगी, यश नगरे, हर्ष गंगावणे, सर्वेश धनावडे, परीक्षित पोवार, जय क्षेत्री आणि क्षितिज पवार यांचा समावेश होता.
विजयी संघाला संघ व्यवस्थापक पी. एल. देवतळे, हरिश नागले, गणेश पेंदोर, क्रिडा समन्वयक सुनिल जगताप, किशोर गव्हाणे, लक्ष्मी थकुरडे, प्राचार्य डॉ. विद्या बॅकॉड यांनी मार्गदर्शन केले.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, युवा उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले.
——————————————————————



