महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीसीओईआर च्या विद्यार्थ्यांची दिवाळी अनाथ आश्रमात

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १४ नोव्हेंबर २०२६) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) महाविद्यालयाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्या अंतर्गत अ‍ॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागांतर्गत एफइएसए आणि लाईफ स्किल्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने “दीपोत्सव” हा उपक्रम राबविण्यात आला. या मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा वापर करून आकाश कंदिल आणि हाताने रंगवलेले दिवे तयार करून त्याची विक्री करण्यात करण्यात आली. यामधून जमा झालेला निधी पिंपरी चिंचवड येथील संत मोणी बाबा अनाथ आश्रमाला आणि झुंज दिव्यांग संस्थेला दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.

तसेच महाविद्यालयाच्या वतीने धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू आश्रमात देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आश्रमातील मुलांसोबत खेळ खेळून दिवाळीचा आनंद साजरा केला. यामध्ये पीसीसीओईआरचे संचालक, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, प्रा. वैशाली निंबाळकर, प्रा. रूपाली पाटील, प्रा. गजानन जाधव, प्रा. राजेश पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ तावरे, संस्कृती बिरादार, निमिष कदम, सार्थक आटोळे, कुणाल तायडे, अथिला पाटील, संजना गाडगे, समृद्धी लांडे आदींनी सहभाग घेतला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button