माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांचा प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, पुणे (दि. ३० डिसेंबर २०२५) माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. सविता आसवानी या २०१२ मध्ये याच वॉर्ड मधून भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांचे पती ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी सविता आसवानी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला होता.
सविता धनराज आसवानी यांनी मंगळवारी पिंपरी कॅम्प मधील झुलेलाल मंदिर व शनि महाराज मंदिरात दर्शन घेतले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या गाठी भेटी घेत, आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते धनराज आसवानी, माजी नगरसेवक काळूराम पवार, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, उद्योजक श्रीचंद आसवानी, दीपक मेवाणी, लहू तोरणे आदी उपस्थित होते. सामाजिक कार्याचा व राजकारणाचा अनुभव असणाऱ्या सविता धनराज आसवानी यांना प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे पिंपरी कॅम्प मधील सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये व पिंपरी चिंचवड लिंक रोड परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
——————————————————————



