महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक
चेतन पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, पुणे (दि. ३० डिसेंबर २०२५) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर युवा सेना प्रमुख चेतन (अण्णा) महादेव पवार यांनी आज मंगळवारी,(दि.३०) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक २५ ड, सर्वसाधारण गट, वाकड पुनावळे या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून चेतन पवार यांना उमेदवारी मिळाली आहे.
या प्रभागातून भाजपाच्या वतीने राहूल कलाटे उमेदवार असतील. कलाटे यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पवार विरुद्ध कलाटे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.
——————————————————————



