एस. बी. पाटील महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी इस्रोचे माजी संचालक डॉ. दिलीप देशमुख, एस. बी. पाटील महाविद्यालय प्राचार्य संदीप पाटील, विविध शाळांमधून सहभागी झालेल्या टीम चे मार्गदर्शक, विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रदर्शनात एकुण ६३ शाळा सहभागी झाल्या होत्या. डॉ. तुषार गायकवाड, संदीप बोरगावकर, स्मिता श्रीवास्तव यांनी परीक्षण केले. विज्ञान शाखा शिक्षिका प्रज्ञा कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या विज्ञान प्रदर्शनात वी. के. माटे स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मॉर्डन स्कूल यांनी व्दितीय क्रमांक व जी. जी. इंटरनेशनल स्कूल यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मधे ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वेब डिझायनिंग मध्ये संत साई हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. अरविंद नातु, डॉ. दिलीप देशमुख, डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. भरत काळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————



