महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

करिअर मध्ये जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा – वसंत नामा गवळी

लिंगायत गवळी समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.०८ ऑगस्ट २०२६) सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना, आपले करिअर घडत असताना नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य देखील पार पाडण्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. लिंगायत गवळी समाजातील तरुणाईचा उपयोग सक्षम, सुदृढ, सुसंस्कृत समाज उभारणीसाठी झाला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या तरुणांनी आपल्या मागच्या पिढीला मार्ग दाखविला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वसंत नामा गवळी यांनी व्यक्त केली.

शनिवारी, (दि.८ ) पिंपरी येथे लिंगायत गवळी विकास फाउंडेशन या संस्थेच्या वतीने लिंगायत गवळी समाजाचा “समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६” सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात १० वी आणि १२ वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विठ्ठल हुच्चे, सोनाली डोईजड, प्रशांत काटकर, संतोष बारसे, भारवी चौधरी, रोशन लंगोटे, श्रुती चौधरी, ॲड. चैताली नामदे, ऋतुजा बहिरवाडे, जयकुमार बीडकर यांचा “समाज गौरव पुरस्कार – २०२६” देऊन आणि राजूभाऊ घुगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, ग्लोबल टेकक्सीस इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. संभाजी बारसे, प्रा. भालचंद्र हुच्चे, खंडू बहिरवाडे, उमाकांत जोमीवाले, नगरसेविका अरुणाताई लंगोटे, गणेश लंगोटे, सुपाआप्पा पिरनाईक, डॉ. किसन झिपरे, प्रवीण हुंडीवाले, कृष्णा भाऊ गठरी, सुरेश शहापूरकर, बंटीभाऊ घुगरे, सोमनाथ हिरणवळे, भगवान औशीकर, दयानंद श्रीलिंग, राजेंद्र लगडे, भीमराव घुगरे, अशोक आप्पा बहिरवाडे, मधुकर औरंगे, लक्ष्मण बहिरवाडे, पंडित आप्पा शहापूरकर, विठ्ठल उन्हाळे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणत नारायण बहिरवाडे यांनी सांगितले की, गवळी समाजाच्या परंपरागत व्यवसायाला चांगले दिवस राहिले नाहीत. आपल्या परंपरागत व्यवसायात अनेक सहकारी संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांची स्पर्धा वाढली आहे. नव्या पिढीने उच्च शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत.

प्रास्ताविक करताना प्रा. संभाजी बारसे यांनी सांगितले की, व्यावसायिक शिक्षण घेऊन आर्थिक उन्नती लवकर होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या टप्प्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवायला हवे. यासाठी लिंगायत गवळी विकास फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. हा सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे.

कार्यक्रम आयोजनात प्रकाश चौधरी, वामन काटकर, मधुकर बिडकर, राजेश चौधरी आदींनी सहभाग घेतला होता.

स्वागत, प्रास्ताविक प्रा. संभाजी बारसे, सूत्र संचालन मयुरी परब आणि आभार मधुकर बिडकर यांनी मानले.
——————————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button