महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पार्थ गुरव यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदावर निवड

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ सप्टेंबर २०२६) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख पदावर पार्थ रमेश गुरव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांनी सांगितले की, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना शहर कार्यकारणीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये पार्थ गुरव यांची उपशहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पार्थ गुरव हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील रमेश विठ्ठल गुरव हे गंगानगर येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख आहेत. पार्थ हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित असून चिंचवड, वाल्हेकर वाडी येथील सुखकर्ता पॅथॉलॉजी लॅब चे ते संस्थापक संचालक आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख तसेच पिंपरी विधानसभा समन्वयक पदावर काम केले आहे. गंगानगर प्राधिकरण मधील सिद्धिविनायक मंडळाचे आणि शिवसेना प्रणित जय भवानी प्रतिष्ठान आकुर्डी या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थेचे कार्याध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघाचे सदस्य, पुणे पॅरामेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष या पदांवर देखील त्यांनी काम केले आहे. मागील वीस वर्षांपासून शहर पातळीवर शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात त्यांचा पुढाकार आहे. तसेच सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक मूलभूत प्रश्नांवर शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पार्थ गुरव नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांच्या निवडीमुळे शहर शिवसेनेत सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button