महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे – सचिन अहिर

दुष्काळ विषयावर विशेष अधिवेशन नाही - सचिन अहिर

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ सप्टेंबर २०२६) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले आहे. गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे अशी मागणी मी गणपती बाप्पाच्या चरणी आज केली आहे असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

गुरुवारी, (दि.२४) भोसरी येथील सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लि. या कंपनीच्या गणपतीची आरती सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, शिवसेना उपनेते व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, समन्वयक सोमेश वैद्य, सीआयइ कंपनीचे अधिकारी विनायक कळसकर, निवृत्ती बच्छाव, बाळासाहेब पाटील, प्रशांत शर्मा, कामगार संघटनेचे पदाधिकारी कृष्णदेव थोरात, दीपक अरगडे, सुभाष जमादार, दत्तात्रय धावडे, ज्ञानेश्वर कळमकर आदी उपस्थित होते.

यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळाची राज्य सरकारने योग्य दखल घेतली आहे. केवळ अहवालावर अवलंबून न राहता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळा विषयी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री याविषयी निर्णय जाहीर करतील. दुष्काळा विषयी विशेष अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही. पुढील दीड ते दोन महिन्यात अधिवेशन होईल त्या अधिवेशनात दुष्काळ विषयावर आमदार आपल्या भावना मांडू शकतील. त्यापूर्वीच सर्व सुरळीत होईल. हे संकट नैसर्गिक आहे. काही ठिकाणी धरणे भरली आहेत, तर काही ठिकाणी पिकं करपली आहेत. शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याच्या भूमिकेत आहे. सर्वच शेतकऱ्यांना वाटते की, माझे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री स्वतः शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधत आहेत. पक्षाच्या वतीने जालना, अमरावती, नागपूर येथे चारा छावण्या सुरू केल्या आहेत. प्रथम शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवून मग चारा छावण्या सुरू केल्या जातील. इतर पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी देखील चारा छावणी सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे असेही विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात डीजे चा वापर करण्यास प्रतिबंध आहे. याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी सांगितले की, उत्सव हा उत्साहात झाला पाहिजे तसेच परंपरेचे देखील जतन झाले पाहिजे. मी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून दरवर्षी कामगारांसोबत भक्तिभावाने गणेशोत्सवात सहभाग घेतो. माझ्या कामगार संघटना देखील कोठेही डीजे न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करून गणरायाची आराधना करतात.
———————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button