महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

इंजीनियरिंग क्लस्टर येथे महिलांसाठी मोफत “इंडस्ट्रियल एस्पायरा” या तांत्रिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम यांच्या सहयोगाने तिसऱ्या बॅचची २८ सप्टेंबरला सुरुवात

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ सप्टेंबर २०२६) युवती व महिलांना अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसाठी आवश्यक ते तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे या संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत सहा महिन्यांचे ऑफलाइन तांत्रिक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती इंजीनियरिंग क्लस्टर पुणे या संस्थेचे संचालक सागर शिंदे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम, पुणे यांच्या सीएसआर सहकार्याने २८ सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या पूर्णतः मोफत असलेल्या “इंडस्ट्रियल एस्पायरा – ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन सीएनसी ऑपरेशन डिझाईन अँड कॉलिटी कंट्रोल” या ऑफलाइन तांत्रिक प्रशिक्षण वर्गाची ही तिसरी बॅच आहे. या उपक्रमांतर्गत उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशन, डिझाईन, क्वालिटी कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, सॉफ्ट स्किल, प्रत्यक्ष औद्योगिक भेटी, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि ऑन द जॉब ट्रेनिंग यांचा समावेश आहे. हे ६ महिन्यांचे प्रशिक्षण २८ सप्टेंबर २०२६ पासून इंजीनियरिंग क्लस्टर पुणे, भोसरी एमआयडीसी, ५३६ जे ब्लॉक, गवळीमाथा जवळ येथे सुरू होणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान बारावी उत्तीर्ण आणि १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवती, महिला अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे व परिसरातील इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये रोजगारासाठी प्लेसमेंट सपोर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील निवडक ५ प्रशिक्षणार्थींसाठी निवास व भोजनाची सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. पहिल्या दोन यशस्वी बॅचच्या यशस्वी अनुभवाच्या पार्श्वभूमीवर या तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे.

इंजीनियरिंग क्लस्टर, पुणे चे संचालक सागर शिंदे यांनी आवाहन केले आहे की, तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपले करिअर घडवावे. अधिक माहितीसाठी इंजीनियरिंग क्लस्टर,पुणे ५३५ जे ब्लॉक, गवळी माथा, एमआयडीसी भोसरी,पुणे
Email – finance@enggclusterpune.com येथे संपर्क साधावा.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button