एमबीए म्हणजे उज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग – रवींद्रन गजेंद्रन
माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स हा यशाचा मूलमंत्र - डॉ. कीर्ती धारवाडकर; एसबीपीआयएम मध्ये आरंभ २०२६ चे उद्घाटन


पिंपरी, पुणे (दि. २६ सप्टेंबर २०२६) एमबीए म्हणजे उज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग आहे. हे शिक्षण घेत असताना आत्मविश्वासाने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित कराव्यात. आजचा विद्यार्थी उद्याच्या मोठ्या आस्थापनांचा व्यवस्थापक आहे. ही जबाबदारी घेताना आत्मविश्वास आवश्यक आहे. तो विकसित करण्याचे काम एसबीपीआयएम इन्स्टिट्यूट करते असे डबलूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस चे कॉर्पोरेट वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रन गजेंद्रन यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या “आरंभ २०२६ इंडक्शन प्रोग्राम” चे उद्घघाटन रवींद्रन गजेंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी एमडॉक्स कंपनीचे सॉफ्टवेअर अभियांत्रिकी संचालक रवींदर पाल सिंग, येस बँक समूहचे कार्यकारी उपाध्यक्ष समीर मुळे, एम. वूडपीकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक समीर कुलकर्णी, एसबीपीआयएम संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, प्रथम वर्ष विद्यार्थी उपस्थित होते.



डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले की, एमबीए हे पुढील जीवनाला योग्य आकार देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स हा यशाचा मूलमंत्र लक्षात ठेवून आचरण करावे.


पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभचे आयोजन करण्यात आले होते.


रवींदर पाल सिंग यांनी सांगितले की, एआय आज तुमच्या जीवनाचा भाग बनले आहे. तुम्हाला एक चांगला सादरकर्ता बनावे लागेल. तुमची संशोधन किंवा सर्जनशीलतेची क्षमता गमावू नका नाही तर एआय तुम्हाला गिळून टाकेल. एआय सोबत स्वतःचा विकास करा, मग यश तुमचेच आहे.

समीर मुळे यांनी सांगितले की, शैक्षणिक काळात अनुभवातून व्यवस्थापकाला अष्टपैलू बनावे लागते. मोठे ध्येय ठेवा. स्वतःला एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित ठेवू नका आणि स्पर्धेत टिकण्यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करा.

समीर कुलकर्णी यांनी सांगितले की, स्वतःबद्दल अभिमान बाळगा. तुमचा संपर्क, संवाद कौशल्य आणि शब्दसंग्रह समृद्ध करा आणि निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.

इनोव्हेंट ड्रम सर्कल या संस्थेने जम्बेग या वादनातून वेगवेगळ्या सुरांवर संगीत तयार करून अनुभव कथन केले. “व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि आर्थिक निरीक्षण प्रणाली” या विद्यार्थी रिसर्च प्रोजेक्टचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजनात सहयोगी प्रा. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. योगेंद्र देवकर, सहयोगी प्रा. डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. विशाल वाघ, सहयोगी प्रा. डॉ. काजल महेश्वरी यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन आणि डॉ. प्रणिता बुरबुरे यांनी केले. आभार डॉ. काजल माहेश्वरी यांनी मानले.
——————————————————————




