महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीसीओईआर येथे ‘आविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासह उद्योग आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आपले कौशल्य अद्यावत करायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा उद्देश ‘आविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतून पूर्ण होत असल्याचे दिसून येते असे महिंद्रा समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रवण पाटील यांनी सांगितले.

पिंपरी एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे आयक्यूएसी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या सहकार्याने “आविष्कार २०२६-२७” या संस्थास्तरीय प्रकल्प स्पर्धेतील पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पीसीसीओईआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. हरीश तिवारी, आयक्यूएसी चे अधिष्ठाता व उपसंचालक डॉ. राहुल मापारी, आर. अँड डी. अधिष्ठाता डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक प्रकल्प संघांनी सहभाग घेतला होता. विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण, सामाजिक समस्या, औद्योगिक गरजा आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी उपायांवर आधारित प्रकल्प पोस्टरच्या माध्यमातून सादर केले.

संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या ज्ञानात वाढ करावी.

आर. अँड डी. अधिष्ठाता डॉ. सुदर्शन बोबडे यांनी देखील मार्गदर्शन केले.

आयोजनात डॉ. राहुल मापारी आणि समन्वयक डॉ. सुखदीप चौगुले यांनी सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button