पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील – विठ्ठल काळभोर
पीसीईटीमध्ये झोनल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ०६ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ने आकुर्डी कॅम्पस सह इतर सर्व कॅम्पस मध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांसह मोठ्या प्रमाणात क्रीडा सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद पीसीईटीला मिळाले हे अभिमानास्पद आहे असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले.

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आकुर्डी येथील पीसीईटी सेंट्रल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या ‘डी – १ झोनल बॅडमिंटन’ स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितल कुमार रवंदळे, पीसीपीच्या प्राचार्य डॉ. विद्या बॅकॉड, पीसीईटी क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे, संघ व्यवस्थापक दीपक सांडभोर, जगदीश कदम, निखिल काळभोर, नम्रता सूर्यवंशी, प्रिया उंडे, क्रिडा प्रभारी सुनिल जगताप, लक्ष्मी थरकुडे, किशोर गव्हाणे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये डी १ झोन मधून मुलांच्या १३ आणि मुलींच्या ९ संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या (पीसीपी) समीक्षा गरगटे आणि जान्हवी पाटील यांनी अंतिम सामन्यात पुण्यातील कुसरो वाडिया संघाचा २ विरुद्ध शून्य अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. कुसरो वाडिया या उपविजेत्या संघात तनिष्का जाधव, वेदश्री पाटील, अलंक्रिता सावंत यांचा सहभाग होता.
मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत झिल तंत्रनिकेतन संघाने पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या संघावर विजय मिळवला. पीसीपी संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. प्रा. संतोष पाचरणे यांनी गुण परीक्षक आणि सिद्धेश पारकर, विद्धेश सार्थक, अकीब मिर्झा, सार्थक भंडारी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सोमनाथ खेडेकर, रुपेश पवार, स्नेहल काटे, दीक्षा ढास यांनी आयोजनात सहभाग घेतला. डॉ. मदन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
——————————————————————



