लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर आकुर्डी येथे संपन्न

पिंपरी, पुणे (दि. १९ जानेवारी २०२६) लातूर जिल्हा मित्र मंडळ आणि सुप्रीम हॉस्पिटल यांच्या वतीने ४१ वे रक्तदान शिबीर रविवारी (दि. १८) रोजी आकुर्डी प्राधिकरण, जय हिंद चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक लक्ष्मीकांत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक बाबूराव सगावकर, प्रमुख पाहुणे उद्योजक अजय मुंगडे, प्रा. रामदास बिरादार, अध्यक्ष नंदकिशोर गुंजोटे,
उपाध्यक्ष संगनाथ राऊत, राहुल देशमुख, सचिव औदुंबर नाईक, कार्याध्यक्ष भास्कर जगताप, मंडळाचे कार्यकर्ते प्रमोद गंगापुरे, मयुर कुमदाळे, प्रशांत गुंजोटे, महेश राऊत, विवेक जगताप, देवानंद गंगापुरे, चेतन गंगापुरे, विवेक दळवी आदी उपस्थित होते.


गेल्या ४० वर्षांपासून लातूर जिल्हा मित्र मंडळ सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. उपक्रमाचे हे ४१ वे वर्ष आहे. यावर्षी १०९ पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. पिंपरी सेरॉलॉजिकल रक्तपेढी येथे संकलित रक्त पिशव्या देण्यात आल्या.
—————————————————————-



