महाराष्ट्रक्रीडाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ म्हणजे पुढील अनेक पिढ्यांसाठी वारसा – देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ स्पर्धकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

Spread the love

पुणे, पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२६) बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा क्रीडा वारसा ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे येथे आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राहुल कुल, महेश लांडगे, चेतन तुपे, हेमंत रासने, शंकर जगताप, महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम आहे. येथे शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा आहेत. पुणे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षण, ऑटो मोबाईल, उत्पादन आणि आयटी तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे देशातील अग्रगण्य शहर आहे. येथील पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य या स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल. आता पुण्याला क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. स्पर्धक आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकोट किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळणार आहे.

‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले.

जगभरातील ३५ देशांमधून आलेले सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी रस्ते आणि आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याचा वेग अभिनंदनीय आहे. गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button