प्रभाग क्रमांक ८ मधील एसआरए प्रकल्प रोल मॉडेल करू – डॉ. सुहास कांबळे
पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी भाजपाला विजयी करा - विलास मेडिगेरी

पिंपरी, पुणे (दि. १३ डिसेंबर २०२६) पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचा कायापालट करून मेट्रो सिटी असा नावलौकिक मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दूरदृष्टी ठेवून विकास प्रकल्प राबविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी मुक्त शहर करून गोरगरिबांना घरे देण्यासाठी या एसआरए प्रकल्प सुरू केले आहेत. एमआयडीसीच्या जागेत असणाऱ्या बालाजी नगर झोपडपट्टीत देखील एसआरए प्रकल्प भविष्यात राबविला जाणार आहे. या प्रकल्पात प्राथमिक, माध्यमिक शाळा, अभ्यासिका, ग्रंथालय, इतर मूलभूत सुविधा, तरुण-तरुणींना रोजगार निर्मितीसाठी आणि व्यसनमुक्तीसाठी निश्चित धोरण राबविले जाईल. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल बहुमताने विजयी करावे असे आवाहन प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार डॉ. सुहास कांबळे यांनी केले.

प्रभाग क्रमांक ८, भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे (अ), नम्रता योगेश लोंढे (ब), निलम शिवराज लांडगे (क), विलास हनुमंतराव मडिगेरी (ड) यांनी सोमवारी सेक्टर नंबर ४ आणि ६ मधील विविध सोसायटी मध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीमध्ये मतदारांशी संवाद साधला. यावेळी सर्व उमेदवार, ज्येष्ठ नेते बी. बी. शिंदे, हनुमंत लांडगे, संदीपान झोंबाडे, संतोष निसर्गंध, अजहर खान, विजय चौधरी, डॉ. अनू गायकवाड यांच्यासह बालाजी नगर, खंडे वस्ती, सेक्टर ४ व ६ मधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी उमेदवार व माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी सांगितले की, या परिसरातील नागरिकांना मी आणि माजी नगरसेवक नम्रता लोंढे यांनी पाठपुरावा करून आरोग्य, वैद्यकीय सेवा सुविधांसह रस्ते, स्वच्छता, वाहतूक क्रीडांगण, उद्यान, सुरक्षितता, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, वृक्ष लागवड या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काम केले आहे. आमच्या पॅनलचे डॉ. सुहास कांबळे हे आर्थोपेडिक सर्जन आहेत. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. नम्रता योगेश लोंढे आणि नीलम शिवराज लांडगे पदवीधर आहेत. आमचे आ. महेश लांडगे सर्व समावेशक नेतृत्व करीत आहेत.

संदिपान झोंबाडे आणि संतोष निसर्गंध यांनी सांगितले की, भाजपाच्या या पॅनेलला बालाजी नगर आणि खंडे वस्ती मधून ३००० पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ.
हनुमंत लांडगे यांनी सांगितले की, प्राधिकरण परिसरातून होणाऱ्या मतदानापैकी ७० टक्क्यांहून जास्त मतदान भाजपाच्या या पॅनेलला मिळवून देणार.
——————————————————————



