महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

सर्वाधिक मताधिक्याने प्रभाग ७ मधील भाजपचा पूर्ण पॅनल विजयी होणार – सुरेखा लोंढे

विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी खोडसाळपणा केला - सुरेखा लोंढे

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १३ जानेवारी २०२६) घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे. याचे भान न ठेवता विरोधक खोडसाळपणे प्रचार करीत आहेत. शुक्रवारी जाहीर होणाऱ्या मतमोजणी मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्याने प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपचे पूर्ण पॅनल विजयी होणार आहे. विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळे ते खोडसाळपणे अपप्रचार करत आहेत अशी टीका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुरेखा लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर केली.

प्रभाग क्रमांक ७, भाजपाचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांच्या प्रचारासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी, भोसरी गावठाण मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये सुरेखा लोंढे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सुरेखा लोंढे यांनी सांगितले की, एनसीपीचे उमेदवार माझ्या घरी आले त्यांनी माझ्या शेजारी उभा राहून फोटो घेतले यानंतर ते फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे याचा मी व आमचे लोंढे कुटुंबीय, भावकी तीव्र निषेध करीत आहे. भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीचा कायापालट झाला आहे. या मतदारसंघात मागील पन्नास वर्षे झाली नाहीत, एवढी विकास कामे आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व माझे कुटुंब सदस्य संतोष लोंढे आणि ॲड. नितीन लांडगे यांनी पाठपुरावा करून केली आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील युवा नगरसेवक रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भारतीय जनता पार्टीच्या विजयाची नांदी सुरू केली आहे. मी स्वतः माझे कुटुंबीय आमची सर्व लोंढे भावकी, पाहुणे, आप्तस्वकीय, मित्रमंडळी प्रचार सुरू झाला तेव्हापासून अविरतपणे प्रभाग क्रमांक ७ मधील भारतीय जनता पार्टीचा प्रचार करून नागरिकांना आवाहन करीत आहे. हे पूर्ण पॅनल सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार आहे अशी सर्वांना खात्री आहे. त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करते की, भारतीय जनता पार्टीच्या या पूर्ण पॅनलला आपले अमूल्य मत देऊन या विजयात सहभागी होऊन साक्षीदार व्हावे, असे आवाहन स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुरेखा लोंढे यांनी यावेळी केले.

मंगळवारी प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांच्या प्रचारार्थ आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीत पीसीएमटी चौक गावाने वस्ती लांडेवाडी विकास कॉलनी आदिनाथ नगर या परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली यावेळी भोसरी गावठाण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तरुण-तरुणी युवा कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button