राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत – धनराज आसवानी
घड्याळाला मत देऊन प्रभाग क्रमांक १९ राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा - कोमल मेवाणी

पिंपरी, पुणे (दि. १० जानेवारी २०२६) गाव खेड्यांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड शहराची स्थापना झाली. आता पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रोसिटी म्हणून ओळखले जात आहे. आय. टी. उद्योग, शिक्षण आणि रोजगारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असलेल्या बेरोजगार तरुणांना पिंपरी चिंचवड येथे रोजगार मिळण्याची खात्री वाटते, मागील ३५ वर्षात लोकांमध्ये हा विश्वास मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी नियोजन करून निर्णय घेतले आहेत. विकासाचा वेग मागील १० वर्षात कमी झाला होता. आता पुन्हा महापालिकेत राष्ट्रवादीला सत्ता द्या असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवाणी यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी श्रीधर नगर, उद्यम नगर, दळवी नगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक काळूराम पवार, कोमल मेवाणी, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे, युवा नेत्या कोमल शिंदे, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हेच पिंपरी चिंचवड च सर्वांगीण विकास करू शकतात असा विश्वास मिळाल्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुज्ञ मतदारांनी १५ जानेवारी रोजी घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी यावेळी मतदारांना केले.
—————————————————————–



