महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

भोसरीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुन्हा भाजपला विजयी करा – ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.११ जानेवारी २०२६) आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मध्ये “व्हिजन २०२५” मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बहुतांश सर्व विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर काही प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेस उपलब्ध होतील. ५० वर्षात झाले नाही ती कामे मागील दहा वर्षात झाली आहेत.

सर्व्हे नंबर एक मधील प्रकल्प पाहता भोसरी गावठाणाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे. आता भोसरीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुन्हा भाजपच्या पूर्ण पॅनेलला बहुमताने विजयी करा असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भोसरी गावठाण, प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांनी केले.

शनिवारी, प्रभाग क्रमांक ७, भाजपाचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (ड) यांच्या प्रचारासाठी विकास कॉलनी, खंडोबा माळ, दिघी रोड, सँडविक कॉलनी, आपटे कॉलनी, शितल बाग या परिसरातील पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. शांती नगर परिसरात पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी मतदारांना भाजपच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडणूक द्यावे असे आवाहन केले.

यावेळी किसन बबन लांडगे, विजय बबन लांडगे, काळूराम पवळे, दत्तात्रय पांडुरंग फुगे, बाजीराव शंकर लांडगे, बाळासाहेब आनंदा लांडगे, राजाराम नथू लोंढे, श्रीकांत लांडगे, सागर डोळस, रमेश पठारे, संजय पठारे, सूरदास फुगे, अशोक लांडे, संदीप गवारे, हिरामण लांडगे, बाबू खराबी, सागर डोळस, किसन लांडगे, जीवन फुगे, राजू लोंढे, सूरदास फुगे, संदीप झंझाड, बाळू गायकवाड, निवृत्ती बजाबा लांडगे, निलेश लांडगे, ॲड. अमर लांडगे, किरण शिवाजी लांडगे, बाजीराव परशुराम लांडगे, कालिदास परशुराम लांडगे, बाजीराव शंकर लांडगे, बंडोपंत जगन्नाथ लांडगे, मनोज जगताप, संजय लक्ष्मण पठारे, अनिल ज्ञानेश्वर लोंढे, वैभव पोळ, चंद्रकांत नथू लोंढे, पै. तुळशीराम लोंढे, अंकुश लोंढे, विजय फुगे, अनिल लोंढे, संतोष फुगे, सागर लोंढे, किरण लांडगे, श्रीकांत लांडगे, चंद्रकांत विठ्ठल लांडगे, योगेश चंद्रकांत लांडगे दत्तात्रेय पांडुरंग फुगे, विजय बबन लांडगे, काळुराम पवळे, पंकज गव्हाणे, राजु राक्षे, दादू डोळस, संदीप राक्षे, हभप सुदाम माने, दत्ताभाऊ गव्हाणे, माऊली भोपते, दिलीप तांबे, राहुल लांडगे, रोहिदास खोंडे, राहुल चंद्रकांत लांडगे आदी सहभागी झाले होते.
———————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button