एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या शोण जाधव चे सॉफ्ट बॉल टेनिस स्पर्धेत यश

पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय शालेय साॅफ्ट बॉल टेनिस स्पर्धा २०२५- २६ मध्ये मुले १७ वर्षाखालील गटात शोण जाधव याने तृतीय क्रमांक क्रमांकासह कांस्य पदक पटकावले आणि त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शोण जाधव हा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल चा विद्यार्थी आहे. या स्पर्धेत पुणे, पिंपरी व पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुला, मुलींनी सहभाग घेऊन कौशल्यपूर्ण सादरीकरण केले.
शोण जाधव याला प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व गौरी उत्तारे यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शोण जाधव चे अभिनंदन करून पुढील सर्व स्पर्धेंसाठी यशस्वी होण्यास शुभेच्छा दिल्या.
——————————————————————



