महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

‘एआयएमएस’ प्रादेशिक परिषद २०२५ पुणे बिझनेस स्कूलमध्ये संपन्न

Spread the love

पिंपरी पुणे (दि. ०३ सप्टेंबर २०२५) – असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल (एआयएमएस) आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पुणे बिझनेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यवस्थापन शिक्षणातील सहयोगी उत्कृष्टता : अकादमी आणि उद्योग क्षेत्रातील दुवा” या विषयावर नुकतीच प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.

या मध्ये दोन पॅनेल चर्चासत्र आयोजित केले होते. “यशाचा डीएनए : उच्च शिक्षणात नावीन्य, सहयोग आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण” आणि “एकविसाव्या शतकातील विद्यापीठांची उभारणी – पुनर्कौशल्यीकरणासाठी शैक्षणिक – उद्योग सहयोग विकसित भारत २०४७” उच्च शिक्षण, तंत्रज्ञान समावेश आणि औद्योगिक अभ्यासक्रम यावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.

यावेळी डॉ. रमाकांत पात्र, डॉ. पराग काळकर, डॉ. अमोल गवांदे, डॉ. बाळकृष्ण सांगविकार, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते.

डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. सचिन वर्नेकर, डॉ. अभिजीत मंचर, डॉ. विजया श्रीनिवास, वैभव देशमुख, दीप्ती शर्मा, जयंत पाटील, डॉ. कीर्ती धारवडकर, डॉ. चेतन चौधरी, डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. शिवाजी मुंढे, डॉ. सुनील धनवडे, रोहित काळकर आणि अमित आंद्रे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
—————————————————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button