भाट नगर आणि बौद्ध नगर परिसरात दुमदुमला घड्याळाचा नारा
प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात आघाडी

पिंपरी, पुणे (दि. ०५ जानेवारी २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह रविवारी, भाट नगर, बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी दारात रांगोळीच्या पायघड्या घालून, दारावर तोरण बांधून उमेदवारांचे औक्षण केले आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी घड्याळाचे चिन्ह पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला.

यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, सुनील साठे, दिनेश मेवाणी, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन धनराज आसवानी आणि कोमल दीपक मेवाणी यांनी केले.

यावेळी उमेदवारांनी महिला भगिनींशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केला आहे, विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महानगरपालिकेमध्ये सत्ता द्यावी असे आवाहन लहू तोरणे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
——————————————————————



