महेशदादांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाची कामे केली – फारुक इनामदार यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (दि. १५ नोव्हेंबर २०२४) भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाची कामे केली, त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून यावेळीही लांडगे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी शहराध्यक्ष फारूक इनामदार यांनी व्यक्त केला. इनामदार म्हणाले की, कोविड काळामध्ये आमदार महेशदादा लांडगे हे सर्वांच्या मदतीला धावून गेले. कोविड काळात दफन करायला निगडी, पिंपरी, भाटनगर, नेहरूनगर, कासारवाडी आदी पाच कबरस्थान दिले गेले होते त्यात मर्यादित जागा ट्रस्टींनी दिल्या होत्या. मात्र वेळ अशी आली होती की, पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड सेंटर मोठ्या प्रमाणात उभारले होते. खेड, मंचर, आळेफाटा भागातून यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्ण आणले जात होते. मात्र एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्याचे नातेवाईक घेऊन जात नव्हते. इथेच दफन करण्याची वेळ येत होती. मुस्लिम समाजासाठी पाच कबरस्थान ही जागा अपुरी पडत होती. हा प्रश्न भविष्यात भेडसावणार हे लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. दफनभूमीसाठी मोशी येथील सहा एकर जागा मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केलेत. आता हे काम टेंडर प्रोसिजर मध्ये आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांना बिल माफ व्हावे यासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी नेहमीच प्रयत्न करून जात-पात न पाहता मदतीचा हात दिला. कामे करताना ते कोणताही भेदभाव करत नाहीत इफ्तार पार्टी घेतात तेव्हा सर्व जाती-धर्माच्या लोकांची त्यात उपस्थिती असते.
आमदार महेशदादा लांडगे यांनी चिखली येथे संत पीठ तसेच संविधान भवन, पर्यटनास चालना देण्यासाठी सफारी पार्क, पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, निगडी ते पिंपरी मेट्रोला मंजुरी, प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न, भोसरी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीचे मैदान, मोशी येथील प्रस्तावित साडेआठशे बेड्स चे रुग्णालय, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, शास्ती कर माफीचा निर्णय अशी अनेक डोळ्यात भरणारी कामे केली आहेत असे इनामदार यांनी सांगितले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कितीही ट्रोल करू द्या माझ्यासाठी तुम्ही वाईटपणा घेऊ नका माझ्यासाठी वैर घेऊ नका हा खूप चांगला संदेश देऊन त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि मित्र परिवाराला जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मित्र परिवाराचे त्यांच्यावरचे प्रेम अधिक वाढले आहे. आमदार महेश दादा लांडगे हे मोठ्या मताधिक्याने भोसरी मतदारसंघातून विजयी होतील. असा विश्वास फारुक इनामदार यांनी व्यक्त केला.