पीसीसीओई चा प्रत्येक माजी विद्यार्थी ब्रँड अँबेसिडर
पिंपरी, पुणे (दि. १४ नोव्हेंबर २०२४) पीसीसीओईचा माजी विद्यार्थ्यांनी आयटी, कला, मनोरंजन स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, परदेशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी यामध्ये स्वतंत्र ठसा उमटवून देशाचे नाव उज्वल केले आहे. सर्वजण एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत याचा पीसीईटीच्या विश्वस्तांसह आम्हा सर्व प्राध्यापकांना सार्थ अभिमान आहे. या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचे देखील मोठे योगदान आहे. त्यामुळे पीसीसीओई चा प्रत्येक माजी विद्यार्थी ब्रँड अँबेसिडर आहे असे मत पीसीईटीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा सिंह, संपदा कुलकर्णी, सौरभ बेदमुथा, संतोष पुजारी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रा. अजित पाटील आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी मागील २५ वर्षांचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे धोरण मिशन, विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम व सर्वांगीण विकासासाठी केलेले काम याची माहिती दिली. महाविद्यालयाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता झाली.
सूत्र संचालन प्रा. राजकमल सांगोले आणि प्रा. सोनल शिर्के व आभार माजी विद्यार्थी वसुंधरा सिंह यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.