‘एक हात मदतीचा’ विसरलो नाही; म्हणून महेशदादांसोबत!
सातारा, सांगली, कोल्हापूरकर मैदानात! विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका
पिंपरी, पुणे (दि. १४ नोव्हेंबर २०२४) पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे मतदान हे दरवेळी निर्णायक भूमिका बजावत असते. गेली दोन टर्म आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरवासी आ. लांडगे यांच्या पाठीशी यंदाही ठामपणे उभे आहेत. आमचे निर्णायक मतदान आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पारड्यात टाकून त्यांची हॅट्रिक निश्चित करणार आहे. कारण, २०१९ मध्ये उद्भवलेली महापूर परिस्थिती आणि महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आम्ही विसरलो नाही, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनार्थ यमुनानगर येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सातारा, सांगली, कोल्हापूरवासियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादीच्या माजी महापौर व भोसरीच्या समन्वयक मंगला कदम यांनी केले. मेळाव्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या कामाचा लेखाजोखा सातारा, सांगली, कोल्हापूरच्या नागरिकांनी मांडला. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे हे कुटुंबप्रमुखा प्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत. गेली दहा वर्ष या मतदारसंघाला परिपूर्ण शाश्वत विकासाच्या कल्पनेतून पुढे नेण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केली असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
तसेच, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, इंजिनियरिंग कॉलेज, न्यायालय संकुल, पोलीस आयुक्तालय, मोशीतील हॉस्पिटल, संतपीठ, संविधान भवन अशा एक ना अनेक गोष्टी आमदार महेश लांडगे यांनी साकारल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे काम अधोरेखित करते. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल आश्वस्त वाटते. ज्यामुळे आमच्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण मिळाले आहे, अशा प्रतिक्रियाही सांगली-सातारा- कोल्हापूरकरांनी दिल्या आहेत.