महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक
पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव होणार


पिंपरी, पुणे (दि. ०५ जून २०२६) अखिल मराठी पत्रकार संस्था, महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने दहावी किंवा बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी किंवा बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार बंधू,भगिनींच्या पाल्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत मंगळवार दि. ९ जून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत बापूसाहेब गोरे यांच्या ९८२२२२२७७२ या मोबाईल वर व्हॉट्स किंवा bapusaheb.gore@gmail.com या इमेल वर सेंड करावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————

