महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

करिअर निवडताना आवड आणि कौशल्य चा विचार करावा – डॉ. शितलकुमार रवंदळे

पालकांनी मुलांचे मित्र व्हावे - व्ही. एस. काळभोर, खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पीसीईटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.८ मे २०२६) विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कौशल्य काय आहे, याचा विचार करून करिअर निवडावे. तसेच भविष्यात या मधून आपल्याला उत्पन्नासाठी रोजगार आणि व्यवसायाच्या किती संधी आहेत याची माहिती घ्यावी. पालकांनी देखील स्वतःची मतं मुलांवर लादू नयेत असे मार्गदर्शन पीसीईटी प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी केले.

आकुर्डी मधील खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी, अनाथ आणि मूकबधिर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे सचिव व श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व्ही. एस. काळभोर, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर, उप महापौर शर्मिला बाबर, माजी उप महापौर दिनकरराव दातीर पाटील, कला क्रीडा विभाग सभापती कैलास कुटे, शंकराव पांढरकर, विजय काळभोर, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विजय कोळपकर, विनायक काळभोर, रोहन मुळे आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट सदस्य, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षात दहावी मध्ये वेदांत दाभाडे ९९ टक्के, अद्विका डागलीया हिने ९७ टक्के आणि १२ वी मध्ये गायत्री कुंभार हिला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना सायकल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ३५० विद्यार्थी, पियुष आणि आयुष फुले या दोन अनाथ विद्यार्थ्यांसह, निगडी येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.

पीसीईटी प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, पालकांनी देखील मुलांची आवड त्यांची मते, त्यांचे कौशल्य याचा विचार करून करिअर निवडी साठी मदत करावी. जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रातील सीनियर लोकांना भेटणे, चर्चा करणे, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे यामुळे करिअर निवडायला मदत होईल. क्षेत्र कोणतेही निवडले तरीही त्यामध्ये कायम अपडेट रहा. प्रत्येक सेमीस्टर मध्ये एक प्रोजेक्ट करा. कॉलेज करतानाच ऑफलाइन किंवा ऑनलाईन इंटर्नशिप करावी असेही डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी आजपर्यंच्या ट्रस्टच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. खंडोबा देवस्थान ट्रस्ट मागच्या ३ वर्षांपासून पीसीइटी सोबत मिळून गुणवंतांचा सत्कार करत आहे. या ट्रस्ट ने मेडिकल कॅम्प, मोफत विवाह सोहळा आयोजित केला आहे. तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. ट्रस्ट केवळ धार्मिक कार्य करत नसून सामाजिक कार्यात देखील पुढे आहे.

पीसीईटीचे सचिव व्ही. एस. काळभोर यांनी सांगितले की, पालकांनी वयात आलेल्या मुलांचे मित्र व्हावे. आई – वडील व मुलांमध्ये चांगले संबंध आणि संवाद असला पाहिजे. पीसीईटी ही संस्था केजी टू पीजी पर्यंत शिक्षण देण्यात अग्रेसर आहे. सुरुवात ३ हजार विद्यार्थ्यांपासून झाली आता इथे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या योजनांचा शिक्षणासाठी फायदा करून घ्यावा असे पीसीईटी चे सचिव व्ही. एस. काळभोर यांनी सांगितले.

कैलास कुटे यांनी सांगितले कि, खंडोबा देवस्थान ट्रस्ट हे १०० वर्षे परंपरागत ग्रामदैवत आहे. या ट्रस्टने धार्मिक कार्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले काम केले आहे. याचा पाया जेष्ठ मंडळींनी रचला आहे.

स्वागत, प्रास्ताविक खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र काळभोर यांनी केले. सूत्र संचालन गणेश काळभोर आणि गणेश दातीर पाटील, आभार संतोष तरटे यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button