महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळाच्या तपपूर्ती निमित्त देशात प्रथमच ‘नरसिंह महायज्ञ’ – माजी खासदार अमर साबळे

पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य, अध्यात्मिक बळ लाभावे यासाठी 'नरसिंह महायज्ञ' - माजी खासदार अमर साबळे

Spread the love

पुणे (दि.१० जून २०२६) देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळाला ९ जून रोजी १२ वर्ष म्हणजेच एक तप पूर्ण झाले आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून जगात सक्षमपणे उभे रहावे हा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण व्हावा, तसेच नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य आणि अध्यात्मिक बळ लाभावे म्हणून देशात सर्व प्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे येथील इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरात “नरसिंह महायज्ञ” करण्यात आला अशी माहिती संयोजक व माजी खासदार अमर साबळे यांनी दिली.

मंगळवारी (दि. ९ जून) सायंकाळी कात्रज, पुणे येथील इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरात संपन्न झालेल्या या नरसिंह महायज्ञात ५७ पुरोहित आणि लक्ष्मी नारायणाच्या स्वरूपात ५७ जोडप्यांनी ५४ आवर्तने करून यज्ञ आहुतीमध्ये सहभाग घेतला. अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात यावेळी भजन कीर्तनाचा जागर करण्यात आला. श्रीकृष्णाची आरती करण्यात आली. तसेच सर्वांना संयोजकांच्या वतीने माजी खासदार अमर साबळे आणि प्रसेनजीत फडणवीस हस्ते भगवद्गीता ग्रंथ वाटप करण्यात आले. महाप्रसाद नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर समितीचे उपाध्यक्ष श्वेत दिप दास, रेवती पती दास, तसेच कौस्तुभ प्रभु दास, गोविंद प्रसाद दास, ध्रुव महाराज दास यांनी सहभाग घेऊन व्यवस्थापन केले.

माजी खासदार अमर साबळे आणि प्रसेनजीत फडणवीस, वेणूताई साबळे, सम्यक साबळे, सुजाता पालांडे, विनायक गायकवाड, ममता गायकवाड, विजय शिनकर, अजय पाताडे, महेंद्र बाविस्कर, अजित कुलथे, कैलास सानप, युवराज लांडे, ललित झुंझुनवाला, हनुमंत लांडगे, सुनील लांडगे, अनिता वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, दिलीप राऊत, निर्गुण कवळे, संतोष टोणगे, सागर मारणे, स्वाती देशमुख, अनघा रुद्र, मनोज देवळेकर, किशोर शिनकर आदींनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.
—————————————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button